स्थिर सरकारमुळे स्टॉक मार्केट सक्षम - उमंग मेहता

स्थिर सरकारमुळे स्टॉक मार्केट 
           सक्षम - उमंग मेहता
Published on
NSK26H30113 जळगाव : रोटरी कल्बतर्फे गुंतवणूक गप्पांच्‍या कार्यक्रमात बेलताना उमंग मेहता. ---------- स्थिर सरकारमुळे स्टॉक मार्केट सक्षम --------- उमंग मेहता : रोटरीतर्फे गुंतवणूक गप्पांचे आयोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : देशात स्थिर सरकार २०१४पासून आहे. त्यामुळे आपले स्टॉक मार्केट भक्कम व सक्षम असून, जागतिकस्तरावर क्रमांक दोनचे स्थान मिळवून आहे, असे मत गुंतवणूकतज्ज्ञ व रोटरी डिस्ट्रिक्ट ओसीव्हीचे सेक्रेटरी उमंग मेहता यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब जळगावतर्फे गणपतीनगरातील रोटरी भवनात बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी महिन्यानिमित्त ‘गुंतवणूक गप्पा-तुमच्या पैशाला योग्य दिशा’ या विषयावरील मुलाखतीत ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, कमिटीचे चेअरमन विनया जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी अध्यक्ष मनोज जोशी यांनी मुलाखतीचे संचालन केले. तीन दशकांचा आर्थिक क्षेत्रातील अनुभव सांगताना उमंग मेहता यांनी नवीन गुंतवणूकदारांनी शॉर्टकटपासून दूर राहावे. कारण त्यांचा अभ्यास नसतो. सुरुवातीला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी, असे त्यांनी सांगितले. प्रॉपर्टी, स्टॉक मार्केट, सोने-चांदी व मुदत ठेव अशा क्रमाने गुंतवणूक करावी. पोर्टफोलिओ कसा तयार करावा. जोखीम व्यवस्थापन हे प्रत्येक व्यक्तीच्या वय, गरजेनुसार असते, असेही त्यांनी सांगितले. मेहता यांनी आगामी काळात बँकिंग, संरक्षण, फार्मास्युटिकल या क्षेत्रांतील शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली. ॲड. आनंद मुजुमदार यांनी आभार मानले. कार्यक्रमास रोटरी सदस्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com