दोन कॉलम फोटोसह
---
NSK26H35136
जळगाव : राजेश पुराणिक लिखित ‘स्वरपंचामृत’ पुस्तकाचे प्रकाशन करताना ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉ. विकास कशाळकर. सोबत ॲड. सुशील अत्रे, रेवती कुरंभट्टी व मान्यवर.
----
''स्वरपंचामृत''मधील रचना
गायकांसाठी ठरतील उपयुक्त
उपशीर्षक
डॉ. कशाळकर : पुराणिक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : धृपद, धमार, त्रिवट, तराणा, चतुरंग हे गीत प्रकार ख्याल गायनापेक्षा प्राचीन आहेत. या सर्व अप्रचलित गायन प्रकारांसंबंधी एकत्रित माहितीची रचना करून राजेश पुराणिक यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉ. विकास कशाळकर (पुणे) यांनी केले.
येथील छाया संगीत साधनाचे संचालक राजेश पुराणिक यांच्या शास्त्रीय संगीतातील दुर्मिळ गायन प्रकारातील धृपद, गत, तराणा, त्रिवट, चतुरंग आदींचा समावेश असलेल्या ''स्वरपंचामृत'' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कशाळकर यांच्याहस्ते झाले, त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधीज्ज्ञ ॲड. सुशील अत्रे होते.
सुरवातीला प्रास्ताविकात श्रृती देशपांडे यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. ''स्वरपंचामृत'' या पुस्तकाच्या लेखनाबद्दल राजेश पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले.
कृपा प्रकाशनच्या संचालिका रेवती कुरंभट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात विधीतज्ञ सुशील अत्रे यांनी ह्या रचना मराठीपुरत्या मर्यादित न राहता परकीय भाषेत लिपीबध्द व्हायला हव्यात, असे विचार व्यक्त केले. डॉ. केतकी पुराणिक यांनी आभार मानले.
----