गंगापूर रोडला ५५ टवाळखोरांवर कारवाई

गंगापूर रोडला ५५ टवाळखोरांवर कारवाई
Published on
फोटो ः 13961 नाशिक : कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान टवाळखोरांवर कारवाई करताना पोलिस. --- गंगापूर रोडला ५५ टवाळखोरांवर कारवाई कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान विविध गुन्ह्यांतील संशयित ताब्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांतर्फे विशेष कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ५५ टवाळखोरांसह विविध गुन्ह्यांतील संशयितांवर कडक कारवाई करण्यात आली. -- परिमंडळ-१ मधील विविध पोलिस ठाण्यांच्या गुन्हेशाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये ८ हिस्ट्रीशीटर, घरफोडी प्रकरणांतील ११ आरोपी, दुचाकी चोरीचे ४ आरोपी आणि शस्त्र अधिनियमांतर्गत ५ आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच, संत कबीर नगर परिसरात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत कॉलेज रोड चौकी परिसर, टायटन शोरूमसमोर आणि शहीद चित्ते पूल अशा तीन संवेदनशील ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान ५४ संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दहा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत एकूण १३ पोलिस अधिकारी आणि ५७ पोलिस अंमलदार रस्त्यावर उतरले होते. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या धडक मोहिमा यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com