पंचवड गणेश मंदिर परिसरात युवकाला मारहाण

पंचवड गणेश मंदिर परिसरात युवकाला मारहाण
Published on
सागर पगार ः OZM26B14084 ------------- ३६-४ साधूच्या मारहाणीत युवक गंभीर जखमी ------------- ओझरच्या पंचवड गणेश मंदिरावत ताब्याच्या वादातून घटना ----------- ओझर, ता.२२ ः येथील पंचवड गणेश मंदिर परिसरात एका साधून केलेल्या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंचवड गणेश मंदिराजवळील टिळकनगर परिसरात राहणारे सचिन प्रभाकर पगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे लहान भाऊ सागर प्रभाकर पागर यांना पंचवड गणेश मंदिरात राहणारे साधू रामबालक दास त्यागी यांनी १८ जूनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास डोक्यात लोखंडी गज मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या नादी लागला तर तुला जीवे मारू असा दम दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. सागर पगार यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी संबंधित रामबालक दास या साधूवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रतन शिंगाडे करीत आहेत. ----------- कोट पंचवड गणेश मंदिर हे आमच्या खासगी मालमत्तेत असून केवळ जागा बळकवण्याच्या हेतूने संबंधित साधू व त्याचे काही साथीदार हे कायमच आमच्यावर दमबाजी करत असतात. या अगोदर पण अनेकदा दमबाजी झाली असून या वेळेस त्यांनी माझ्यावर जोरदार हल्ला करत मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने कठोर कारवाई व्हावी - सागर पगार, ओझर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com