एम एन जी एल पाईपलाईन पंचर झाल्याने गॅस पुरवठा बंद

एम एन जी एल  पाईपलाईन  पंचर झाल्याने गॅस पुरवठा बंद
Published on
गॅस पाइपलाइनला इंदिरानगरमध्ये गळती इंदिरानगर, ता.२२ : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील वनवैभव परिसरात पाणीपुरवठ्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून गॅस पाइपलाइमधून गळती सुरू झाली. यामुळे दोन ते अडीच तास ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. वनवैभव कॉलनी परिसरात भूमिगत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीचा धक्का भूमिगत एमएनजीएल गॅस वाहिनीला लागल्याने गळती सुरू झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने संबंधित परिसरातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एमएनजीएलचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेत सुमारे दोन तासांनंतर गॅस पुरवठा पूर्ववत केला. मात्र, अचानक गॅस पुरवठा खंडित झाल्याने परिसरातील नागरिकांना स्वयंपाकासह दैनंदिन कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागल्याचे येथील राजसारथी सोसायटीचे अध्यक्ष अरुण मुनशेट्टीवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com