चेतनानागर : सह्याद्री युवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी फोडताना शारदा शाळेच्या विद्यार्थिनी (छायाचित्र राजेंद्र बच्छाव)
--
शारदा शाळेच्या गोपिकांनी
फोडली चेतनानगरची दहीहंडी
इंदिरानगर, ता : ६ : गेली २५ वर्षे दहीहंडीची परंपरा जपणाऱ्या चेतनानगर येथील श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि सह्याद्री युवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात राणेनगर येथील जाजू विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आणि स्थानिक युवकांनी येथील हंडी फोडली. या दहीहंडी उत्सवाला चेतनानगर, इंदिरानगर, राजीवनगर, वासननगरसह सिडकोमधील नागरिकांनी गर्दी केली होती.
येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात हा महोत्सव रंगला. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि ट्रस्टचे संस्थापक अमोल जाधव यांनी या उत्सवाच्या आयोजन केले होते. गोविंदा आणि गोपिकांच्या पथकाला रोख ७००१ रुपयांचे बक्षीस आणि गणवेश भेट देण्यात आले. माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी स्वागत केले. शारदा संस्थेचे विश्वस्त रवींद्र आगळे, मुख्याध्यापक अजय पवार, अनिल गायकवाड ज्योती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळातर्फे मनोज चव्हाण, अजय पाटील, रमेश जगताप, आप्पा बाविस्कर, अरविंद अत्तरदे, नारायण धामणे, योगेश कापडी, शैलेश कार्ले, अमेय जाधव, मानसी जाधव, नीलेश वर्पे आदींनी संयोजन केले.