शिरपूर : शिव महापुराण कथा सांगता

शिरपूर : शिव महापुराण कथा सांगता
Published on
SHC26B12703 शिंगावे (ता. शिरपूर) : सांगता समारंभात उपस्थित आमदार काशीराम पावरा, प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे व पदाधिकारी. --- शिंगावे येथे शिवमहापुराण कथेची सांगता हजारो भाविकांनी घेतला सोहळ्याचा लाभ शिरपूर, ता. १५ : शिंगावे येथील मातोश्री कॉलनीत संगीतमय शिवमहापुराण कथेची नुकतीच सांगता झाली. प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे (अकोलेकर) यांनी सादर केलेल्या सातदिवसीय कथा सादरीकरणाचा लाभ हजारो शिवभक्तांनी घेतला. दररोज रात्री आठ ते ११ या वेळेत कथा सादर करताना शिव-पार्वती, गणेश- रिद्धी, सिद्धी विवाह आदी प्रसंगाचे सजीव देखावे सादर करण्यात आले. कथा श्रवणासाठी महिला भक्तांचा विशेष प्रतिसाद लाभला. ठाकरे यांच्या हस्ते १२ मेस सकाळी काल्याचे कीर्तन झाले. त्यांना कापडणे, उंटावद, वनावल, साकवद, करवंद नाका, रथ गल्ली, वरचे गाव येथील भजनी मंडळांची साथ लाभली. आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपचे नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, तालुकाध्यक्ष भरत पाटील, पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र गिरासे, संतोष माळी, उपसरपंच चंद्रकांत लोटन पाटील आदी उपस्थित होते. श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराने संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com