SHC26B12945
शिरपूर : तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देताना पदाधिकारी.
---------
पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्याचा निषेध
मुस्लिम समाजातर्फे गुन्हा दाखल करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २५ : मोहंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अनुद्गार काढल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
येथील तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. २५) पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांची भेट घेऊन निवेदन दिले. १९ जूनला इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर एका पॉडकास्टमध्ये सूत्रसंचालिका दिव्या सिंह यांच्याशी संवाद साधतांना नाझिया इलाही खान या महिलेने हजरत मोहमंद पैगंबर यांच्याविषयी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह, अवमानजनक व धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला असून, त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबंधितांचे कृत्य भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा असून, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हा आक्षेपार्ह व्हिडीओ तातडीने समाज माध्यमांवरुन नष्ट करावा, नाझिया खान व दिव्या सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, भाजपचे नगरसेवक इरफान मिर्झा व जुमा मशिदीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.