अऽतीभवती
फोटो-21514
वावी ः विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे बियाणेवाटपप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, हर्शल राजेभोसले, गणेश वेलजाळी, सोमनाथ कांदळकर, दीपक वेलजाळी आदी.
विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे
बियाणे, छत्रीवाटप
सिन्नर ः वावी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे बियाणे, छत्री व स्कूल बॅगचे वाटप झाले. विघ्नहर्ता प्रतिष्ठान, आयसीएआर ऊस संशोधन संस्था व जैविक नियंत्रण केंद्रातर्फे हा उपक्रम झाला. या वेळी शेतकरी प्रशिक्षणही झाले. सरपंच सोमनाथ कांदळकर अध्यक्षस्थानी होते. वावीच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज सभागृहात हा कार्यक्रम झाला. १२८ शेतकऱ्यांना या वेळी विविध बियाण्यांचे वाटप झाले. डॉ. ज्ञानेश्वर बोरसे यांनी आधुनिक शेती, जैविक शेतीपद्धती याविषयी माहिती दिली. हर्शल राजेभोसले, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दीपक वेलजाळी, महेश खाटेकर, रवींद्र कहांडळ, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले, स्नेहल भेंडाळे, प्रदीप गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वेलजाळी, चंद्रकात पठाडे, कन्हूशेठ भुतडा, नंदूशेठ मालपाणी, उत्तम संधान, राकेश अनाप, किरण घेगडमल, माधुरी वेलजाळी, नीता पठाडे, अनिल घेगडमल, रामदास घेगडमल उपस्थित होते. डॉ. सागर घेगडमल यांनी सूत्रसंचालन केले,. प्रा. कारभारी वेलजाळी यांनी आभार मानले.
...............................