उद्योग वाढीसोबत मजबूत नफा ही व्यावसायिक ताकद

उद्योग वाढीसोबत मजबूत नफा ही व्यावसायिक ताकद
Published on
पान दोन ॲंकर 22570 (जुना आहे) सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या कार्यशाळेप्रसंगी उपस्थित महेश सावडेकर यांच्यासह सुकुमार नायर, बबन वाजे, राहुल नवसे, रतन पडवळ, अरुण चव्हाणके, मुकेश देशमुख आदी. ----------------- ३६-४ वाढीबरोबर नफा, कॅशफ्लो हवा मजबूत -------------- महेश सावडेकर : ‘सीमा’तर्फे ‘द प्राफिट फर्स्ट सिस्टीम’वर उद्योजकांना मार्गदर्शन ----------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.४ : ‘विक्री वाढतेय, व्यवसाय वाढतो, पण प्रत्यक्ष नफा आणि कॅश फ्लो कुठे आहे’, हा प्रत्येक उद्योजकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे. केवळ टर्नओव्हर वाढवून उपयोग नाही; व्यवसायाच्या वाढीसोबत नफा आणि कॅश फ्लो मजबूत असणे हीच खरी व्यावसायिक ताकद असल्याचे प्रतिपादन नफा प्रवेगक प्रशिक्षक महेश सावडेकर यांनी केले. सिन्नर इंडस्ट्रिअल ॲड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा) तर्फे आयोजित ‘द प्राफिट फस्ट सिस्टीम’ या विशेष विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सावडेकर यांनी उद्योजकांना व्यवसायातील नफा वाढविण्यासाठी शिस्तबद्ध आर्थिक प्रणाली उभारणे, कॅश फ्लो प्रभावीपणे व्यवस्थापित करावा, याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन केले. अनेक उद्योजकांचा व्यवसाय आणि टर्नओव्हर वाढत असला, तरी वाढता खर्च, अनियोजित आर्थिक व्यवहार, अनावश्यक खर्च आणि व्यवसायातील छुपी आर्थिक गळती यामुळे अपेक्षित नफा हातात राहत नाही. त्यामुळे ‘किती विक्री झाली त्यापेक्षा किती नफा शिल्लक राहिला हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसायाची खरी प्रगती केवळ उलाढालीच्या आकड्यांवर मोजली जाऊ नये. नफा, कॅश फ्लो आणि आर्थिक स्थैर्य या तीन बाबी मजबूत असतील तरच उद्योग दीर्घकाळ प्रगती करू शकतो. उद्योजकांनी आपल्या व्यवसायातील पैशाच्या प्रत्येक व्यवहाराकडे नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पाहण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन केले. सीमाचे अध्यक्ष सुकुमार नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिबिरास सचिव बबन वाजे, कोषाध्यक्ष राहुल नवले, विश्वस्त रतन पडवळ, अरुण चव्हाणके, मुकेश देशमुख, अरुण खालकर, नवनाथ नागरे, प्रवीण महाजन आदींसह उद्योजक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com