निमगाव-सिन्नरला वीज पडून एक ठार, दोन जखमी

निमगाव-सिन्नरला वीज पडून एक ठार, दोन जखमी
Published on
वीज पडून शेतमजुराचा मृत्यू; दोघे गंभीर निमगाव-सिन्नर येथे दुर्घटना; गोंदे येथे गाय ठार सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २२ : तालुक्यात मंगळवारी (ता. २२) दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. निमगाव-सिन्नर येथे शेतात टोमॅटो तोडणीचे काम करणाऱ्या मजुरांवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला; तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. गोंदे येथे वीज पडून गाय ठार झाली. दुपारी तीनच्या सुमारास या घटना घडल्या. जाटला रोशिया (वय ४०, रा. सेंधवा, मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले असून, त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. त्यांची नावे समजू शकली नाहीत. दुपारी पाऊस सुरू झाल्यावर हे मजूर योगेश आव्हाड यांच्या शेतात टोमॅटो तोडण्याचे काम करीत होते. पावसापासून बचाव करण्यासाठी ते जवळच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या आडोशाला बसले. दरम्यान, परिसरातील अन्य शेतकऱ्यांकडे काम करणारे मजूरही तेथे येऊन बसले. त्याचवेळी अचानक वीज कोसळल्याने जाटला रोशिया यांचा जागीच मृत्यू झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. गोंदे येथे गाय ठार गोंदे येथे आशाबाई शंकर शिंदे यांच्या घराजवळ बांधलेली गाय वीज पडल्याने ठार झाली. या घटनेत आशाबाई शिंदे यांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती तहसील कार्यालयाला देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com