पैसा झाडांपुढे मातीमोलच ः अभिनेते सयाजी शिंदे

पैसा झाडांपुढे मातीमोलच ः अभिनेते सयाजी शिंदे
Published on
पान-४ मेन THG26B01499 ठाणगाव ः हरित महासंकल्पाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात बोलताना अभिनेते सयाजी शिंदे. व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयकर आयुक्त भरत आंधळे, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, उद्योजक राजेश मालपाणी आदी. -------------------- THG26B01498 ठाणगाव ः बेलटेकडी परिसरात सह्याद्री देवराई नामफलकाचे उद्घाटन करताना अभिनेते सयाजी शिंदे, भरत आंधळे, संतोष झगडे, प्रशांत बच्छाव, रंगनाथ पाठारे आदी -------------------------- गावागावात देवराई उभी राहावी -------------- सयाजी शिंदे ः ठाणगावातील १०० हेक्टरात जगविलेल्या सह्याद्री देवराईचे नामकरण आणि वर्षपूर्ती साजरी -------------- सकाळ वृत्तसेवा ठाणगाव, ता. २ ः वाढत्या पर्यावरण असमतोलामुळे आॅक्सीजन मिळणे मुश्कील बनत आहे, त्यामुळे मोफत आॅक्सिजन तयार करणाऱ्या झाडांसमोर पैसा मातीमोलच आहे, असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. येथील बेलटेकडी परिसरात सह्याद्री देवराई उपक्रमात हरित महासंकल्पाच्या वर्षपूर्ती समारंभात ते बोलत होते. प्रत्येक गावागावात देवराई उभारून त्याची संगोपन करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, उपवनसंरक्षक राकेश सेपट, उपवनसंरक्षक गणेश रणदिवे, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, मालपाणी उद्योग समुहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, उद्योजक अंजन भालोडिया, अतिरिक्त आयकर आयुक्त भरत आंधळे व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. आंधळे यांच्या पुढाकाराने ठाणगाव परिसरातील सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर एक लाख २० हजार वृक्षांची एक वर्षापूर्वी लागवड करण्यात आली होती. वंजारी व अल्पसंख्याक भवन, जयहिंद लोकचळवळ, मालपाणी ग्रुप, श्रीजी ग्रुप, वनव्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने उन्हाळ्यातही या झाडांना पाणी देऊन सुमारे ९८ टक्के झाडे जगविण्यात यश आहे. या उपक्रमाची वर्षपूर्ती तसेच सह्याद्री देवराई उपक्रमाचे नामकरण अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पारंपारिक वेशातील आदिवासी मुलींनी नृत्य करत पाहुण्यांचे स्वागत केले. अभिनेते शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून वृक्ष संवर्धनाची सामुहिक प्रार्थना म्हणून घेतली. ते म्हणाले,‘ निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. परंतु काळाच्या ओघात आपण निसर्गावर मात केली आहे. सामाजिक बांधिलकीतून भविष्यातील पर्यावरण नुकसानीला आपणच जबाबदार आहोत. आज झाडांमध्ये देव शोधण्याची वेळ आली आहे. तसे न केल्यास घरे मोडून झाडे लावण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, भविष्याचा विचार करुन निस्वार्थी भावनेने वृक्ष संवर्धन करणे ही सामाजिक चळवळ समाजात राबविणे गरजेचे आहे. समतोल पर्यावरणासाठी समाजात बदल घडविणे काळाची गरज आहे. अतिरिक्त आयकर आयुक्त भरत आंधळे म्हणाले की, सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर एक लाख २० हजार झाडे लावून ती उत्तम प्रकारे जोपासली आहेत. भविष्यात ठाणगाव परिसरातील तीन डोंगरांवर यापेक्षा मोठा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. या चळवळीत जिल्हाचे संपूर्ण प्रशासन एका चौकटीत आणले आहे. पर्यावरणाचे रक्षणासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. कर्नल मच्छिंद्र शिरसाठ, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, उद्योजक अंजन भालोडिया, लेखक रंगनाथ पाठारे, गजेंद्र हिरे, उद्योजक राजेश मालपाणी, दशरथ वर्पे आदींची भाषणे झाली. प्रांताधिकारी दीपा जेधे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, कवी प्रकाश होळकर, उद्योजक विकास काकड, परसराम आंधळे, भगवान काकड, अमोल आव्हाड, बाळासाहेब काकड, संतोष वालझाडे, गोकूळ आंधळे, डी. एम. आव्हाड, दत्तु काकड, अतुल आव्हाड, नीलेश दोंड, अमोल दोंड, दशरथ आव्हाड, आबाजी काकड, मोहन काकड, अभिषेक काकड, राजेंद्र काकड आदी उपस्थित होते. वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रतीक शिंदे यांनी आभार मानले. --------------- १६-१ दृष्टीक्षेपात - अभिनेते सयाजी शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून वृक्ष संवर्धनाची सामुहिक प्रार्थना म्हणून घेतली. - वृक्षसंवर्धन उपक्रमाच्या वर्षपूर्तीला मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी एकत्र आले. - अतिरिक्त आयकर आयुक्त भरत आंधळे यांच्या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देत ग्रामस्थांची लक्षणीय गर्दी होती. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com