पान-२ ॲंकर करणे
--------
VNI26B12862
वणी ः वणी- मुळाणे रस्त्याच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या डांबरीकरणाची अवस्था.
--------------
३६-४
व्यवस्थेविषयीच्या नाराजीची सोशल मिडियावर धूम
----------
गावोगावच्या रस्त्याच्या दुरवस्थेविषयी ‘ आम्ही मतदान कराव....हे गाणं मोठ्या प्रमाणावर व्हायरल
----------
दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.५ : खेडोपाडी आणि गावागावांत रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि वाहतुकीच्या समस्येचे वास्तव दाखविणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंना जोडलेल्या उपरोधिक कविता आणि गाण्याच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील संतापाला वाट मोकळी करून देण्यात आली आहे. ''आम्ही मतदान करावं, तुम्ही खोटं बोलावं...'' या बोचऱ्या ओळीने सुरू होणाऱ्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. याच धर्तीवर रस्त्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारे विविध व्हिडिओही प्रसारित होत आहेत.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होते. डांबरी रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यांवर साचणारे पाणी, चिखलाचे साम्राज्य आणि अनेक ठिकाणी वाहून गेलेले रस्ते यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र या व्हिडिओंमधून दिसत आहे. शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार, शेतकरी तसेच रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा सूर या पोस्टमधून उमटत आहे.
१६-१
रस्त्यावर खड्ड्यांचा पाऊस !
निवडणुकीच्या काळात रस्ते, पाणी, वीज आणि विकासकामांची आश्वासने दिली जातात. मात्र निवडणूक संपल्यानंतर त्याच प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचे या उपरोधिक गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे ''आम्ही मतदान करावं, तुम्ही खोटं बोलावं'' ही ओळ केवळ गाण्याचा भाग न राहता व्यवस्थेविषयीच्या नाराजीचे प्रतीक ठरत आहे.
१६-१
गाण्यातून व्यवस्थेला आरसा
सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या या व्हिडिओंची विशेष बाब म्हणजे कोणतेही मोठे भाषण न करता रस्त्यांची प्रत्यक्ष अवस्था दाखवून त्यावर उपरोधिक शब्दांची फोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्यांना ''विकासाच्या दाव्यांपेक्षा जमिनीवरील वास्तव काय? असा प्रश्न पडत आहे. मतदानाच्या वेळी नागरिकांनी आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामाचा हिशेब मागावा, असा संदेशही या माध्यमातून दिला जात असल्याचे दिसते.
१६-१
खड्डे झाले ''कंटेन्ट'', पण प्रश्न गंभीर -
गावागावच्या रस्त्यांची दुरवस्था हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर प्रश्न आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढतो, वाहनांचे नुकसान होते आणि ग्रामीण भागातील दळणवळणावर परिणाम होतो. त्यामुळे व्हायरल व्हिडीओंमधील उपरोधाकडे केवळ विनोद म्हणून न पाहता त्यामागील नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
----------------