YEO26B25732
येवला : मकाच्या खळ्यावर पकडलेला नाग.
---------------
२०-१
मक्याच्या खळ्यावर
साडेचार फुटी कोब्रा
---------
सर्पमित्र सोनवणेंच्या प्रयत्नांना यश
---------
येवला : येथील हरिभाऊ ठाकूर यांच्या मकाच्या खळ्यावर साडेचार फूट लांबीचा अत्यंत विषारी इंडियन कोब्रा'' (नाग) जातीचा सर्प आढळून आल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. येथील सर्प मित्र दीपक सोनवणे यांनी हा कोब्रा शर्तीच्या प्रयत्नांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देत यशस्वी रेस्क्यू केला. खळ्यावर मका काढण्याचे व आवराआवरीचे काम सुरू असताना अचानक या मोठ्या नागाचे दर्शन झाले. नाग समोर येताच कामगारांची धावपळ उडाली. हरिभाऊ ठाकूर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ प्रसंगावधान राखून स्थानिक सर्पमित्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधला.घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र सोनवणेंनी कसलाही विलंब न करता मक्याच्या खळ्यावर धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि शांततेने, नागाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. साडेचार फुटी जहाल विषारी कोब्रा नाग जेरबंद झाल्याने ठाकूर परिवार आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. सोनवणेंनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि धाडसाबद्दल ठाकूर परिवारासह ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
------------