लोकसहभागातून चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प!

लोकसहभागातून चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प!
Published on
YEO26B26570 येवला : शांतता कमिटीच्या बैठकीत सहभागी पदाधिकारी व अधिकारी. --------------- येवल्यात लोकसहभागातून चौकात सीसीटीव्ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत अनेक निर्णय सकाळ वृत्तसेवा येवला, ता.३ : येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने गणेशोत्सवादरम्यान डिजेचा अनावश्यक खर्च टाळून, शहरातील प्रमुख चौकांमध्ये व ठिकठिकाणी लोकसहभागातून आणि गणेश मंडळांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा उभारण्याचा एकमुखी संकल्प सोडण्यात आला. पोलिस प्रशासनाच्या या संकल्पनेला सर्व उपस्थितांनी व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची ग्वाही दिली. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गणेश मंडळांना पोलिसांना सहकार्य करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. शहर पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, तालुका पोलिस निरीक्षक संदीप बोरसे, मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे आदी उपस्थिती होते. बैठकीदरम्यान पोलिस प्रशासनाकडून गणेश मंडळांना महत्त्वाच्या सूचना केल्या. आठ दिवस अगोदर सर्व मंडळांनी नियमानुसार ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने पोलिसांकडे परवानगी अर्ज सादर करावेत, आगमन व विसर्जनावेळी डिजेची मर्यादा पाळावी, रात्री बारानंतर मिरवणुका सुरु ठेऊ नये आदी सूचना करण्यात आल्या. अनावश्यक खर्च टाळून सुरक्षेच्या दृष्टीने चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची संकल्पना पोलिस निरीक्षक मंडलीक यांनी मांडली, त्याला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत गणेशोत्सव अत्यंत आनंदाने, उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करत नगराध्यक्ष लोणारी, बंडू क्षीरसागर, बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ता निकम, शिवसेनेचे अमोल शिंदे, नगरसेवक एजाज शेख, राहुल लोणारी, नाना लहरे, अविनाश कुक्कर, धीरज परदेशी आदींनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विविध पक्षांचे पदाधिकारी, शांतता व मोहल्ला समितीचे सदस्य, पोलिस पाटील, पत्रकार उपस्थित होते. संदीप बोढरे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन सोनवणे यांनी आभार मानले. घरगुती व मंडळाची गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सामाजिक व प्रबोधनात्मक देखावे साकारणाऱ्या नागरिकांसह मंडळांना हजारों रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष लोणारी यांनी जाहीर केले. ----------- बैठकीतल्या प्रमुख मागण्या... - लोंबकळलेल्या तारा व्यवस्थित कराव्यात. - रस्त्यात पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत. - तुटलेले ढापे,कमजोर ढापे त्वरित दुरुस्ती करावी - वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नये. - मंडळांनी अधिकृत वीज जोडण्या घ्याव्यात - विसर्जनाची सुविधा दरवर्षीप्रमाणे सर्व ठिकाणी करावी - मंडळानी डीजे न लावता पारंपारिक वाद्य वाजवावे - सामाजिक देखावे आणि उपक्रमांवर भर द्यावा ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com