तब्बल ३६ हजार मतदारांची नावे प्रारूप यादीतून गायब..! एसआयआर पुनर्परीक्षणानंतर येवल्यात खळबळ,नगरसेवकांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

तब्बल ३६ हजार मतदारांची नावे प्रारूप यादीतून गायब..! एसआयआर पुनर्परीक्षणानंतर येवल्यात खळबळ,नगरसेवकांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
Published on
पान-१ साठी YEO26B26599 येवला : प्रांत कार्यालयात निवेदन देण्यापूर्वी वगळलेल्या नावांची माहिती देताना नगरसेवक --------------- ४०-४ मतदार यादीत नाही, फॉर्म ६ भरून द्या ------------- प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन ः येवल्यातील नगरसेवकांच्या निवेदनावर नागरिकांना आवाहन -------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.५ : येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघातील तब्बल ३६ हजार मतदारांची नावे यादीत नसल्याप्रकरणी लोकप्रतिनधींनी प्रशासनाकडे धाव घेत जाब विचारला. त्यावर प्रांताधिकारी बाबसाहेब गाढवे यांनी नाव नसलेल्यांनी आवश्यक पुराव्यासह फॉर्म ६ भरून द्यावा, त्यांची नावे मतदारयादीत येतील तसेच मतदान ओळखपत्रही देण्यात येतील असे स्पष्ट केले. ------------------------ एसआयआर पुनर्परीक्षणानंतर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत हा प्रकार उघड झाला आहे. कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार, मृत मतदार, दुबार नोंदणी तसेच शोध घेऊनही संपर्क न झालेल्या मतदारांच्या नोंदी वगळण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक पात्र मतदारांची नावेही प्रारूप यादीतून वगळली गेल्याच्या तक्रारी पुढे आल्याने लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विविध भागांतील नागरिकांनी आपली नावे यादीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक आठमध्ये सुमारे ४०० हून अधिक मतदारांची नावे कमी झाल्याचे नगरसेवक प्रवीण बनकर यांनी म्हटले आहे. भाजपचे नगरसेवक समीर समदडिया, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दीपक लोणारी, प्रवीण बनकर, गुड्डू जावळे, समर्थ अलगट,गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नावे येतील पण फॉर्म भरावा..! मतदार यादीतून नाव वगळल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून, प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची प्रत्येकाने तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ज्यांचे नाव प्रारूप यादीत नाही, त्यांनी फॉर्म क्रमांक ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी नागरिकांना सध्या एक महिन्याची मुदत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत. --------- कोट एसआयआर प्रक्रियेतून वगळलेल्या नावांबाबत तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःचे नाव मतदार यादीत तपासावीत, अडचण आल्यास लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा. - समीर समदडिया,नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com