26724
येवला : कर्नाटक मध्ये ७३ तास स्केटिंग करणारे येवल्यातील चिमुकले खेळाडू.
फास्टेस्ट स्केटिंग स्पर्धेत
येवल्यातील खेळाडूंची ७३ तास स्केटिंग
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१५ : वेगाशी स्पर्धा, जिद्दीची कसोटी अन् ७३ तासांचा अथक सहभाग...या जोरावर कर्नाटकातील शिवगंगा स्केटिंग रिंकच्या आयोजनाखाली झालेल्या १०० मीटर फास्टेस्ट स्केटिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात येथील आर्यन स्केटिंग क्लबच्या राघव प्रशांत सानप,सिद्धेश दिलीप काठवते, चैतन्य पंकज पाबळे, श्रीराम सुदेश गोरे आणि इवान प्रफुल्ल सोनवणे या खेळाडूंनी रिले प्रकारात सहभाग नोंदवत येवल्याच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली.
रिले प्रकारात तब्बल ७३ तास या खेळाडूंनी स्केटिंग करत या खेळाडूंनी चिकाटी, शारीरिक क्षमता आणि उत्कृष्ट स्केटिंग कौशल्याचे प्रदर्शन केले. या पाचही खेळाडूंना आर्यन स्केटिंग क्लबचे संचालक व प्रशिक्षक सचिन आहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या उपक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळवली आहे.
----
चौकट
विभागीय स्पर्धेसाठी निवड
जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत कल्बच्या ११ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेत झेप घेतली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सिद्धेश दिलीप काठवते, ईश्वरी सतीश जाधव,आरुषी रमेश आहिरे, चैतन्य पंकज पाबळे, शिवरुद्रा देविदास साठे, व्योम परेश रायजादे, श्रीराम सुदेश गोरे, क्षितिज योगेश जाधव, साई जगन्नाथ दरेकर, शर्वरी योगेश जाधव आणि राजनंदिनी गणेश फुलारे यांचा समावेश आहे. खेळाडूंच्या यशाबद्दल तालुका क्रीडा अधिकारी शिवप्रसाद घोडके यांनी शुभेच्छा दिल्या.