पिंपळगाव बसवंत: जुलै महिन्याच्या अखेरीस पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोची आवक सुरू झाली असून, सध्या सुमारे सात हजार क्रेट टोमॅटोची नोंद होत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच दरात चढ-उतार दिसून येत असून, एका २० किलोच्या क्रेटला ९५१ ते १,०५१ रुपये इतका दर मिळतो आहे. याचा अर्थ किलोमागे ५० रुपये दर मिळत आहे.