आता प्रत्येकाला नाशिक शहराची स्मार्ट सफर करता येणार...

nashik city
nashik cityesakal

नाशिक : वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील २२०० किलोमीटर रस्त्यांचे ट्रॅफीक मैल मॅपिंग होणार आहे. चौफेर विखुरलेल्या शहरातील आठही दिशांना प्रत्येक किलोमीटर अंतरावरील स्थळ चिन्हांकीत करुन वाहतूकीला दिशा देतांनाच, अपघातग्रस्तांना मदतीपासून तर बाहेरगावच्या नवख्या पर्यटकाला केवळ रंग, रेषा, अंक आणि दिशांच्या आधारे नाशिक शहराची स्मार्ट सफर करता येईल. असे नियोजन आहे.

वाहतूक पोलिस (Traffic Police) आणि महापालिका (NMC) यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे नियोजन सुरु आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या नियोजनाला महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह प्रादेशिक परिवहन आणि इतरही विभागाचा संयुक्त प्रयत्न असणार आहे. सीबीएस शून्य किलोमीटर केंद्रबिंदू टपाल कार्यालय हे प्रत्येक शहराचे शून्य (०) किलोमीटर समजले जाते. तेथून शहरातील रस्त्याचे किलोमीटर मॅपिंग होते. नाशिकला मात्र सीबीएस बसस्थानक शुन्य किलोमीटर गृहीत धरुन त्यानुसार सर्व आठही दिशांचे रंगानुसार मॅपिंग होईल.

रस्त्याचे स्मार्ट मॅपिंग
रस्त्याचे स्मार्ट मॅपिंग esakal

आठही मार्गावर प्रत्येक किलो मीटर अंतरावर स्थळ चिन्हांकित केले जाईल. शहरातील सगळ्या २२०० किलोमीटर रस्त्यांच्या मॅपिंग करायचे कालांतराने हे सगळे आठही मार्गावरील चिन्हांकित स्थळ गुगल मॅपवर टाकले जातील. त्यामुळे शहराच्या आठही दिशांपैकी कुठल्याही भागातील दिशेला किंवा त्यावरील रस्त्यावर साधा अपघात जरी झाला तरी पोलिसांच्या कमांड कंट्रोल रुमला माहीती मिळेल. नेमके स्थळ लक्षात येणार असल्याने पोलिसांकडून अपघातग्रस्ताच्या मदतीपासून तर आवश्यक त्या सगळ्या प्रकारची मदत पोहोचविता येईल.

चौकट रंग रेषा अंक अन दिशा शहराचे अनोख्या पध्दतीने मॅपिंग करतांना पोलिस आठ दिशांसाठी आठ रंग निवडून मार्गाचे दिशादर्शन करणार आहे. समजा नाशिक (nashik) ते नाशिक रोड या एक विशिष्ठ रंग असेल त्याच रंगाचे दिशादर्शक फलक आणि प्रत्येक किलोमीटर अंतरावर ठराविक चिन्ह असेल असेच इतर सगळ्या भागांसाठी त्या त्या भागाची ओळख दर्शविली जाईल. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या पर्यटकालाही केवळ रंगाच्या मार्गदर्शनावरुन त्या भागात जाता येईल.

जसजसे अंतर जास्त होईल. त्यानुसार प्रत्येक रस्त्याला क्रमांक देउन अंकाचा वापर होणार आहे. शहरातील चौफेर आठही मार्गावर त्याच पध्दतीचे मार्गदर्शक फलक असतील. त्यामुळे सध्याचे मोबाईल मधील गुगल मॅपींग वरुन रस्ता चटकन लक्षात येणार नाही. पण विशिष्ट रंगाच्या दिशादर्शक फलकांमुळे मात्र कुणालाही स्मार्टपणे मार्गाक्रमण करता येईल. असा स्मार्टनेस पोलिस आणू इच्छितात.

डिजीटल तंत्राची जोड सध्या गुगल मॅपिंगद्वारे शहरातील रस्ते जोडलेले आहे. जीपीएस मॅपिंगवरुन प्रवासा दरम्यान गुगल प्रचलित (अलग्लोरिदम) नुसार जवळचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे मार्ग भरकटण्याचा धोका असतोच पण संबधित मार्गावर एकाच रंगाचे फलक लावण्याच्या ट्रॅफिक मैल प्रणालीनुसार शहराबाहेरील सामान्य पर्यटक किंवा वाहन चालक केवळ रंगाच्या फलकांचा अंदाज घेत त्यावरील किती किलोमीटर (मैलावर) जायचे एवढ्या माहीतीवर हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकणार आहे.

याच मार्गावर शहरात २२०० किमीचे ररस्त्यावर त्या त्या भागा साठीच्या निवडलेल्या रंगानुसार, दिशादर्शक, नो पार्किंगचे फलक, सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग, सीसीटीव्ही अशा सुविधातून हे मार्ग जीपीएस प्रणालीशी जोडले जाणार असल्याने खऱ्या अर्थाने स्मार्ट वाहतूक प्रणाली कार्यान्वीत होणार आहे. उपनगरांतल्या रस्त्यांना क्रमांक दिला जाणार. यानुसार रस्ते व शंभर मीटरचे निशाण ओळखले जाईल.

nashik city
महिलांची लॉटरी लागणार...

- फक्त रंग आणि कि.मी. क्रमांकावर जाता येणार

- आपत्तकालीन स्थितीत नेमकेपणाने मदत जाणार

- प्रत्येक दिशेला विशिष्ट्य रंगाच्या दिशादर्शक फलक

- रंग आणि किलोमीटर सांगूनही कुठेही पोहोचता येणार

nashik city
मुलांच्या लसीकरणात नाशिक राज्यात अव्वल!

"नाशिक शहर स्मार्ट आहे. हे म्हणून चालणार नाही तर प्रत्यक्षात शहर स्मार्ट असल्याचा प्रत्येकाला अनुभवता आल पाहिजे. ट्रॅफिक मैल संकल्पनेतून महापलिका, आरटीओ, स्मार्ट सिटी महामंडळासह विविध यंत्रणाच्या एकत्रित प्रयत्नातून रंग,रेषा, अंक दिशाचा वापरातून शास्त्रोक्त स्वरुपाचा प्रयोग राबविण्याचे नियोजन आहे."

- जयंत नाईकनवरे (पोलिस आयुक्त नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com