नाशिक- मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील महापालिका हद्दीतील द्वारका व मुंबई नाक्यासह जवळपास सहा जंक्शनवरील वाहतूक कोंडीतून नाशिककरांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. बुधवारी (ता. २५) झालेल्या पाहणीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच द्वारका व मुंबई नाका स्वतंत्र न समजता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला जाणार आहे.