
Nashik News : नाशिक रोडची वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी; उपाययोजना करण्याची मागणी
नाशिक रोड : येथे सध्या वाहतुकीचा प्रश्न मोठी डोकेदुखी ठरतो आहे. जेलरोड, नाशिक रोड, बिटको पॉइंट, दत्त मंदिर, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन या ठिकाणी नागरिक नो पार्किंगमध्ये गाड्या लावून जात असल्यामुळे नाशिक रोडला रोजच वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यावर शाश्वत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहे. (Traffic congestion on Nashik Road railway station headache Demand for action Nashik Latest Marathi News)
हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
हेही वाचा: Nashik Crime News : दागिने बनविण्याच्या बहाण्याने सव्वादोन लाखाचे दागिने लंपास
सैलानी बाबा येथील ठिकाणापासून शिवाजी नगर, जेल रोड पाण्याची टाकी, कारागृह, नोट प्रेस, बिटको, दत्त मंदिर, गायकवाड मळा, पोलिस स्टेशन, उड्डाणपुलाच्या आसपासचा परिसर या ठिकाणी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला नाशिक रोड येथील व्यापारी आणि दुकानदार वैतागले आहेत. नाशिक रोडला सध्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे. यामुळे रोज लहान-मोठे अपघात घडत आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नाशिक रोडला वाहतूक पोलिसही कमी असल्यामुळे सर्वत्र वाहतूक समस्या निर्माण झालेली आहे. रेल्वे स्थानकावर व बस स्टेशनवर नो पार्किंगमध्ये वाहने लावून जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. येथील नोट प्रेसच्या बाहेर नो पार्किंगचा बोर्ड असतानाही या ठिकाणी प्रेस कामगार सर्रास वाहने लावून ड्यूटीवर जात आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतच असून कामगारच त्यांच्या कार्यालयाचे नियम धुळीत मिळवत आहे.
"वाहतुकीवर पोलिसांनी अंकुश ठेवला पाहिजे. विशेष करून रेल्वे, बस स्थानक, दत्त मंदिर, बिटको पॉइंट, गायकवाड मळा, मुक्तिधामच्या आसपासच्या परिसरात वाहतूक शाखेने पेट्रोलिंग करण्याची आवश्यकता आहे. वाहन चालकांनाही शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे."
-गोकूळ नागरे, सामाजिक कार्यकर्ते
हेही वाचा: Nashik News : वाहनाच्या अपघातात दुचाकी स्वार ठार; 1 जखमी