नाशिक- शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका व वाहतूक पोलिस प्रशासनाने पार्किंग व नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करत उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, वाइन शॉप्स, बिअर बार, हॉटेल्स आणि वाहनांच्या शोरूमसमोरील अनधिकृत वाहन उभ्या केल्यामुळे कोंडीत अधिक भर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांच्या मदतीने नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.