Traffic
sakal
नाशिक, जुने नाशिक: द्वारका चौफुलीपाठोपाठ मुंबई नाका सर्कल, नाशिक रोड वाहतूक कोंडीने जाम झाला. इंदिरानगर बोगद्याचे काम सुरू असल्याने तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. परिणामी, इंदिरानगरकडे जाणारी वाहतूक मुंबई नाका सर्कलकडे आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे नाशिककडून नाशिक रोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.