सावरकर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी |Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : सावरकर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी

नाशिक : सावरकर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी

नाशिक रोड : नाशिक- पुणे महामार्गावर सिन्नर फाटा ते चेहेडी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असून, छोटे-मोठे अपघात होत आहे. रस्ताचे काम संथ गतीने सुरू आहे. एक वर्ष उलटूनही काम पूर्ण होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याला एक ते सव्वा वर्ष लागत आहेत. खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे यांनी वेळोवेळी पाहणी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मात्र, त्या सुचनांकडे दुर्लक्ष करून अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. रस्ताच्या कामामुळे शनिवारी (ता. २०) चेहेडी शिव येथे अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली. या अपघाताला संबंधित ठेकेदाराला जबाबादार धरावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा: नागपूर : जि.प.च्या सर्व शाळांमध्ये लागणार संविधान स्तंभ

सिन्नर फाटा येथेही रस्त्याचे काम सुरू असून, तेथे काही वाहतूक पोलिस सिन्नरहून येणाऱ्या वाहनचालकांना अडवितात व कागदपत्रांची मागणी करतात. परिणामी, वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण होतो व कधी कधी अपघात होतात. वाहतूक पोलिसांनी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत विनाकारण वाहनधारकांना त्रास देऊ नये, अशी मागणी होत आहे. वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पोलिस पावत्या फाडत असतात. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोठेही यंत्रणा नसल्याने रुग्णवाहिकेलाही वाहतूक कोंडीत अडकत आहे.

जुना पुणे नाका, एकलहरा चौफुली, ओम साई हॉटेल, निसर्ग लाॅन्ससमोर रस्ता ओलडताना नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. वाहतूक कोंडीचा रुग्णावाहिका, सिन्नर औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसत आहेत. वि. दा. सावरकर उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहने मागे पुढे घेण्यावरून वाहनधारकांमध्ये वाद होत आहेत.

loading image
go to top