पंचवटी- पावसाळ्यात रस्त्यात खड्डे ही बाब नाशिककरांना काही नवीन नाही. पंचवटीतील बळी मंदिर चौकात खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच वाहनचालकासह नागरिक हैराण झाले होते. वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डा बुजवून सामाजिक भानाचे उदाहरण समाजासमोर सादर केले आहे.