Traffic Problem : वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी जंक्शनवर ड्रोन सर्वेक्षण!

मुंबई नाका भागात संध्याकाळी सर्वाधिक गर्दी
Traffic Problem
Traffic Problemesakal

Traffic Problem : औरंगाबाद महामार्गावरील अपघातानंतर शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ॲक्शन मोडवर आलेल्या पोलिस व महापालिका प्रशासनाने मुंबई नाका भागात ड्रोन सर्वेक्षण केले.

त्याच धर्तीवर शहरातील सर्वच जंक्शनवरील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबई नाका येथील ड्रोन सर्वेक्षणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत वाहतूक ठप्प होत असल्याचे निदर्शनास आले आहे. (Traffic Problem Drone survey at junction to solve traffic jam nashik news)

महापालिका, पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालय या तीनही शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक होऊन शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

शहरात नवीन आधुनिक सिग्नल यंत्रणा बसविणे, रोड फर्निचर दुरुस्त करणे, सूचना फलक बसविणे, ड्रोन सर्वेक्षण करून उपाययोजना सुचविणे, आवश्‍यक त्या ठिकाणी भुयारी मार्ग, उड्डाणपुलांची निर्मिती करणे आदी कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार पोलिसांनी मुंबई नाका भागात ड्रोन सर्वेक्षण केले. त्यात सांयकाळी पाच ते साडेपाच या वेळेत या भागात वाहनांची फारशी गर्दी नसते, सहा ते साडेसहा या वेळेत मुंबई नाका पोलिस ठाण्याकडून द्वारका, भाभानगर, पाथर्डीकडे जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक असते.

सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत महामार्ग बसस्थानक, मुंबई नाका पोलिस ठाणे, भाभानगर, पाथर्डीकडून दोन्ही बाजूने वाहने अधिक प्रमाणात येतात. रात्री आठ ते साडेआठ या वेळेत भाभानगर, द्वारका, पाथर्डीकडे जाणारी वाहने अधिक प्रमाणात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Traffic Problem
Unseasonal Rain : जायखेड्यासह परिसरात अवकाळी पाऊस

मुंबई नाक्याप्रमाणेच शहरातील सीबीएस ते मेहेर सिग्नल स्मार्ट रस्ता, द्वारका व वडाळा नाका सिग्नल, लेखानगर, इंदिरानगर बोगदा, पाथर्डी फाटा उड्डाणपुलाखालील रस्ते, बळी महाराज मंदिर सिग्नल, बिटको पॉइंट, सिन्नर फाटा, उपनगर नाका, फेम सिनेमा चौक या भागात ड्रोन सर्वेक्षण करून पर्याय सुचविले जाणार आहेत.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाययोजना

शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण केले जाणार आहे. विशेष करून मुंबई नाका, द्वारका, इंदिरानगर या भागातील बोगद्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. सर्वेक्षण करताना सुटीचे दिवस व गर्दीचे दिवस असे दोन वर्गवारीत सर्वेक्षण होईल.

सर्वेक्षणासाठी आयआयटीयन्सची मदत घेतली जाणार आहे. दर महिन्याच्या शेवटी वाहतुकीचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Traffic Problem
National Startup Awards : राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारासाठी अर्जाची 31 मेपर्यंत अंतिम मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com