Unseasonal Rain : जायखेड्यासह परिसरात अवकाळी पाऊस

Unseasonal Rain Damage
Unseasonal Rain Damageesakal

Unseasonal Rain : जायखेडा शहरासह परिसरात शनिवार (दि. ८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पंधरा मिनिटे झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. (Unseasonal rain in area including Jaikheda nashik news)

जायखेडा शहरासह परिसरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आधीच शेतमालाला भाव नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्यात ऐन कांदा गळतीच्या वेळेस झालेल्या अवकाळी पावसामूळे कांदा उत्पादनात मोठी घट झाली असून जे काही उरले आहे त्यातही काल शनिवार (ता.८) रोजी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या पूर्व मोसमी पावसामूळे मोठे नुकसान झाले आहे.

या पावसामुळे कांदा जमिनीतच सडतो की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, आंबा, मिरची, टोमॅटो वेलवर्गीय भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Unseasonal Rain Damage
Jalgaon Unseasonal Rain : जळगावात कोसळल्या पावसाच्या सरी; वातावरणात उकाडा

हवामान खात्याने सांगितल्यानुसार सकाळपासूनच प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन झालेल्या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

तसेच यावर्षी मोसम खोऱ्यात मोठ्याप्रमाणात बहरलेल्या गावरान आंब्यांनाही या वादळी पाऊसाचा मोठा फटका बसला असून, वादळवाऱ्यामुळे अनेक झाडांच्या कच्या कैऱ्या झटकल्या गेल्याने, या आंब्यांच्या उत्पादनातही मोठ्याप्रमाणात घट होणार आहे.

Unseasonal Rain Damage
Dhule Unseasonal Rain : पिंपळनेरसह परिसरात अवकाळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com