A Heartbreaking Loss on the Eve of Rakshabandhan : रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला नाशिकजवळील वडनेर दुमाला गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुष भगत असं या मुलाचं नाव आहे. या घटनेने आयुषची आठ वर्षीय बहीण श्रेया आणि कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.