पाच विद्यार्थ्यांच्या भन्नाट रपेटीत २ जीव गेले, ३ गंभीर

पाच विद्यार्थ्यांच्या भन्नाट रपेटीत २ जीव गेले, ३ गंभीर
Published on: 
पाच विद्यार्थ्यांच्या भन्नाट रपेटीत २ जीव गेले, ३ गंभीर गंगगिरी आश्रमशाळेत सुरक्षा रक्षकांची डोळेझाक अन् बंद सीसीटीव्ही भोवले पालघर, ता. २० (वृत्तसंस्था) : हिरडपाडा (ता.जव्हार) येथील गंगगिरी आश्रम शाळेतून रात्रीच्या सुमारास गुप्तपणे बाहेर पडून नवरात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे. हे पाच विद्यार्थी एकाच दुचाकीवरून गावी परतत असताना कोंगडी घाटात त्यांची बाईक घसरून रस्त्याच्या कडेकडील खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवारी (ता.१९)पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली. मृत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता १२ वी मध्ये शिकणारा सुमित मोतीराम भिंगळ (१८) आणि इयत्ता ९ वी मधील प्रितम गणेश पोटिंडा (१५) यांचा समावेश आहे. अपघातानंतर एका जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकाने या घटनेची माहिती जव्हार पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथे एका विद्यार्थ्याला मृत घोषित करण्यात आले, तर गंभीर असलेल्या इतर तीन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्रिसदस्यीय चौकशीअंती निलंबनाची कारवाई विद्यार्थी रात्रीच्या वेळी वसतिगृहातून बाहेर कसे पडले, याबाबत पालकांकडून आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकाच वेळी पाच जण एकाच दुचाकीवरून बाहेर पडल्याने शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उघड झाला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार, वसतिगृहात अनिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले. या गंभीर दुर्घटनेची गंभीर दखल घेत जव्हारचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ रामकुमार यांनी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अखेर शाळेचे मुख्याध्यापक, वॉर्डन आणि रात्रीच्या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून व संघटनांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com