esakal | रेल्वेचा प्रवास ठरतोय असुरक्षित! गुन्हेगारीत वाढ, धावत्या रेल्वेत 648 घटना
sakal

बोलून बातमी शोधा

railway

रेल्वेचा प्रवास ठरतोय असुरक्षित! गुन्हेगारीत वाढ

sakal_logo
By
अमोल खरे

मनमाड (जि.नाशिक) : अत्यंत विश्‍वासाचा आणि जिव्हाळ्याचा प्रवास म्हटला, तर रेल्वेकडे बघितले जाते. मात्र, काही घटनांमुळे रेल्वे सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. धावत्या रेल्वेत वाढत चाललेली गुन्हेगारी, चोरी हा कळीचा मुद्दा होत आहे. एकेकाळी अत्यंत सुरक्षित प्रवास म्हणून मानला जाणारा रेल्वेप्रवास (railway travel) आता असुरक्षित वाटू लागला आहे.

आठ महिन्यांत ६४८ चोरीच्या घटना; १२४ गुन्हे उघड

मनमाड लोहमार्ग (manmad railway) विभागात जाणाऱ्या-येणाऱ्या धावत्या रेल्वेत आठ महिन्यांत ६४८ चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर यातील केवळ १२४ गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेषतः मनमाड रेल्वेस्थानकामुळे देशातील प्रमुख शहरे जोडली गेली आहेत. येथून मुंबई, दौंडमार्गे पुणे, बेंगळूरू, चेन्नई आणि गोवा, भुसावळमार्गे दिल्ली, अमृतसर, जम्मू, कोलकता, औरंगाबादमार्गे हैदराबाद, सिकंदराबादला जाता येते. देशातील एक महत्त्वाचे जंक्शन म्हणून मनमाड स्थानकाचा समावेश आहे. देशाच्या चारही भागांकडे प्रवास करण्यासाठी रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे, असे असतानाच या धावत्या रेल्वेत मात्र सुरक्षेला प्राधान्य नसल्याचेच वेळोवेळी दिसून आले आहे.

गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ

मनमाड येथे लोहमार्ग विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या विभागांतर्गत मनमाड, नाशिक, इगतपुरी, भुसावळ, नंदुरबार, चाळीसगाव, शेगाव ही प्रमुख रेल्वे स्थानक येतात. या स्थानकावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाची आहे. मात्र, सदर गुन्हे लोहमार्ग पोलिसांत दाखल होत असतात. कोरोना काळ सुरू असला तरी काही प्रमाणात रेल्वेसेवा सुरू आहे. प्रवासी गाड्या ये-जा करत आहे. त्यामुळे अनेक व्ह‌ीआयपी या स्थानकावरून जातात. काही दिवसांपासून रेल्वे फलाटावरील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी धावत्या रेल्वेतील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा: येवल्यात परंपरा खंडीत करुन शेतमालाचे लिलाव

लाखोंच्या चोरीचा समावेश

भुसावळ, मनमाड, नाशिक या स्थानकांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे. आठ महिन्यांत ६४८ घटना घडल्या असून, त्या दाखल झाल्या आहेत. तर यातील केवळ १२४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. यात मनमाड, नाशिक, इगतपुरी, भुसावळ, नंदुरबार, चाळीसगाव, शेगाव या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या गाड्यांमध्ये लाखोंच्या चोरीचा समावेश आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०२० दरम्यानचे गुन्हे

स्थानके दाखल उघडकीस आलेले

भुसावळ - २३२ २९

मनमाड - १८५ १४

नाशिक - १०३ ११

इगतपुरी - ५८ ६

चाळीसगाव - ५२ ३

नंदुरबार - ३० २

शेगाव - ४९ २

एकूण - ७०९ ६७

जानेवारी ते ऑगस्ट २०२१

स्थानके दाखल उघडकीस आलेले

भुसावळ - २०६ ३४

मनमाड - १४३ ३८

नाशिक - १०१ १२

इगतपुरी - ५३ १८

चाळीसगाव - ५० ८

नंदुरबार - ५१ ५१

शेगाव - ४५ ८

एकूण - ६४९ १२४

हेही वाचा: शिपायाच्या मुलाला मिळणार नोकरी; उच्च न्यायालयाचा निकाल

loading image
go to top