Nashik ZP News : बदलीनंतरही भाऊसाहेबांना सोडवेना टेबल! जि. प. विभागाकडून अद्यापही अनेक कर्मचारी जागेवरच

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal

Nashik ZP News : वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून असल्याने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे मुख्यालयातील विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या ६ जूनला बदल्या झाल्या; मात्र दोन महिने उलटूनही अनेक भाऊसाहेब आहे त्याच टेबलवर आहेत.

बांधकाम विभाग एक, दोन, तीन, अर्थ, शिक्षण अशा सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. बदली झालेल्या ठिकाणी अद्यापही हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या किमान पंधरावर आहे. (transfer from zp department many employees are still in same place nashik news)

हजर न होण्याचे कारण ना विभागप्रमुखांनी वरिष्ठांना कळविले, ना कर्मचाऱ्यांनी स्वतः. त्यामुळे यामागे मोठे आर्थिक गणित तर नाही ना, अशी चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.

एका विभागात पाच वर्षे, तर एका टेबलावर तीन वर्षेपेक्षा जास्त काळ कर्मचारी ठेवता येत नसल्याचा शासनादेश आहे. मात्र, गत काही वर्षांपासून अंतर्गत बदल्या झालेल्या नव्हत्या. त्याची ओरड झाल्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी लागलीच त्या करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार ६ जूनला सामान्य प्रशासन विभागाने सेवाज्येष्ठता यादी करत सरसकट सर्व कर्मचाऱ्यांचे टेबल बदलले. त्याबाबतचे आदेश देखील निर्गमित करण्यात आले. या आदेशानंतर साधारण आठवडाभरानंतर सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा आदी विभागांनी आपापल्या विभागातील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP Nashik latest marathi news
Narendra Modi : नाशिकच्या महंतांकडून पंतप्रधानांना ताम्रपत्र! 100 श्‍लोक कोरलेला ‘मोदी शतकम’ ताम्रपट

मात्र, महत्त्वाचे व सर्वाधिक तक्रारी असलेल्या बांधकाम व अर्थ विभागाने दोन महिने उलटूनही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केलेले नसल्याचे सांगितले जात आहे. कर्मचाऱ्याला सोडण्यास टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा आहे.

यात त्या-त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही पाठराखण केली जात असल्याचे बोलले जात आहे. बांधकाम विभाग एक, दोन व तीन, अर्थ, तसेच इतरही काही विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असल्याने त्यांना पदमुक्त करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

अजूनही तेथेच काम

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील एका महिला कर्मचाऱ्यांची या प्रक्रियेत बदली झालेली असताना टेबल सोडत नव्हती. त्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यांस पदमुक्त करण्याचा फार्स करण्यात आला. परंतु अद्यापही संबंधित महिला कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी काम करून या टेबलावर येऊन सायंकाळी काम करत असल्याची चर्चा विभागातच आहे.

ZP Nashik latest marathi news
Nashik News : मनपाच्या सोनोग्राफी सेंटरमुळे खासगीवाल्यांना ‘पोटदुखी’; तक्रारींच्या आडून बंद पाडण्याचे उद्योग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com