NMC Officer Transfer : डॉ. आवेश पलोड यांची तडकाफडकी बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC

NMC Officer Transfer : डॉ. आवेश पलोड यांची तडकाफडकी बदली

नाशिक : महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे रजेवर जात असतानाच बदलीचे आदेश निघाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Transfer of NMC Health Officer Dr avesh palod nashik news)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे जवळपास पंधरा दिवसांच्या रजेवर जात आहे. ते रजेवर जात असताना शनिवारी (ता. ४) त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर डॉ. पलोड यांच्या बदलीचे आदेश टाकले.

यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या जागी यापूर्वी काम केलेल्या डॉ. कल्पना कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक कुटे यांची बदली करताना त्याच वेळी त्यांची बदली का झाली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.

आता पुन्हा त्यांची त्याच पदावर नियुक्ती केली गेल्याने व पलोड यांची बदली झाल्याने नेमका प्रशासनाच्या गोंधळाविषयी संशय व्यक्त केला जात आहे.