ब्रेकिंग : विश्वास नांगरें पाटलांची मुंबईत बदली; तर दीपक पांडे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त; अखेर चर्चांना पूर्णविराम!

vishwas nangre.jpg
vishwas nangre.jpg
Updated on

नाशिक : अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या बदल्यांबाबत आता पूर्णविराम मिळाला आहे.  नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे

बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी

पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिय आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत. 
पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. .    

एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. 
एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

former mla Sanjay Chavan Urges CM Devendra Fadnavis
Police Probe Alleged Abduction and Sexual Assault After Jewellery Purchase Pretext
NCP workers staged a symbolic tree plantation protest over potholes on the Sakri Shirdi National Highway, demanding immediate road repairs.
NCP (Sharad Pawar) workers staged a sit-in protest at the Mahavitaran office in Satana against the installation of smart meters without consumers' consent.
Marathi News Esakal
www.esakal.com