Nashik Transfers : नाशिक विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

Transfer
Transfer esakal

Nashik Transfers : उत्तर महाराष्ट्रातील अठरा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नाशिकला निवासी उपजिल्हाधिकारी पुरवठा अधिकाऱ्यांसह भूसंपादन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Transfers of Deputy District Collectors in Nashik Division news)

नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या जागी धुळे येथील भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ यांची बदली झाली आहे. अरविंद नसरीकर यांची नगरला महसूल उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे.

त्यांच्या जागेवर धुळे येथील पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ बदलून येत आहेत. नाशिकचे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची धुळ्यात रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

भूसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांची नाशिकला वन जमाबंदी अधिकारी पदावर बदली झाली आहे. नगरच्या पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांची जळगावला भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. जळगावचे भूसंपादन अधिकारी किरण सावंत यांची श्रीरामपूरला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची नगरला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली असून नगरचे निवडणूक उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांची भुसावळला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांची नाशिकला भूसंपादन उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्या जागेवर तर धुळे येथील महसूल उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांची निफाडला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Transfer
Chaitra Pournima : येवला आगाराला चैत्रपोर्णिमा पावली तब्बल 10 लाखांना!

धुळे येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांची जळगावला पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली आहे. नंदुरबारचे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांची धुळे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी तर नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांची नगरला जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावर बदली झाली आहे.

इतर विभागात बदल्या

त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची पालघरला पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तर संदीप निचित यांची मुंबईला उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

नगरच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांची श्रीवर्धन (जि.रायगड) येथे उपविभागीय अधिकारी तर नगरच्या भूसंपादन अधिकारी उज्‍वला गाडेकर यांची माण-खटाव (जि.सातारा) येथे विभागीय अधिकारी पदावर बदली झाली आहे

यांचे आदेश बाकी

निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, गणेश मिसाळ, अर्चना पठारे, अनिल पवार, सुनील सूर्यवंशी, गोविंद दाणेज, पल्लवी निर्मळ यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित होणार आहेत.

Transfer
Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये गुदमरतोय प्रवाशांचा जीव!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com