Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये गुदमरतोय प्रवाशांचा जीव!

Coaches carrying passengers.
Coaches carrying passengers.esakal

Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच आता समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

पंचवटी एक्स्प्रेसला जुन्या डब्यांप्रमाणेच डबे हवे असताना दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा प्रवाशांना गैरसोयीच्या असणारे डबेच बसवण्यात येत असून प्रवाशांना प्रवास करताना हे डबे प्रशस्त नाही म्हणून पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी रेल्वे बोर्डाला लिखित तक्रार करत निवेदन पाठवले आहे. आमचा श्वास गुदमरत असल्याची खंत निवेदनात व्यक्त केली आहे. (Passengers suffocating in Panchavati Express nashk news)

पंचवटी एक्स्प्रेसचे जवळपास १७ डबे माटुंगा कार्यशाळा येथे पाठवण्यात आल्याच्या कारणास्तव बदलण्यात येणार असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले आहे. काही डबे जे नुकतेच बदलले आहेत ते जुन्या पॅटर्नचे आहे.

ज्या विषयी मोठ्या प्रमाणात आक्षेप व तक्रारी आल्या होत्या. म्हणून प्रवाशांना समोरासमोर बैठक व्यवस्था असणारे डबे स्थापित करण्यासाठी रेल्वेला निवेदन देण्यात आले आहे.

नाशिक मधून रोज किमान दीड ते दोन हजार प्रवासी पंचवटीने प्रवास करतात रेल्वे, कस्टम, बँक, महाविद्यालय, शाळा, कोर्ट, मंत्रालय, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, एम एस ई बी, खाजगी कंपन्या मध्ये काम करणारे असंख्य प्रवासी या गाडीने प्रवास करतात. म्हणून प्रवाशांनी निवेदनात आपल्या समस्या मांडल्या आहेत.

कमी खिडक्या, असुविधाजनक जागा, अरुंद गँगवे, लहान खुर्च्या, दोन खुर्च्यांमध्ये कमी अंतर त्यामुळे प्रवाशांचा जीव घुटमळतो असे निवेदनात म्हटले आहे. यामुळे अस्वस्थ होणे, अडचणीत प्रवास करावा लागणे घाम येणे अशा समस्यांना प्रवासी तोंड देत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Coaches carrying passengers.
Weather Forecast : अवकाळीसह गारपीट सोडेना पाठ; आजपासून 4 दिवस मध्यम सरींचा अंदाज

याबाबत "मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशन नाशिक" चे अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष व विभागीय सल्लागार समिती सदस्य किरण बोरसे, कैलास बर्वे, संजय शिंदे, सुदाम शिंदे, नितीन जगताप, रतन गाढ़वे, सुनिल केदारे, संतोष गावंदर, गणेश नागरे, अॅड. क्रांती गायकवाड, उज्वला कोल्हे यांनी मध्य रेल्वेचे व्यवस्थापक व भुसावळ विभागाकडे पत्राद्वारे समोरील आसन असले व सुधारित 2021 नंतर तयार केलेले डबे पंचवटी एक्स्प्रेसला देण्यात यावे असी मागणी केली आहे.

"उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंचवटी एक्स्प्रेसचे डबे बदलून जे जूने डबे लावले आहेत त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी समस्थ प्रवाशांचा होणारा त्रास लक्ष्यात घेता पंचवटी एक्स्प्रेसला नविन 2021 नंतरचे समोरासमोर आसने असणारे डबे उपलब्द करून द्यावे."- राजेश फोकणे. अध्यक्ष,मासिक पासधारक प्रवासी वेल्फेअर असोसिएशन

Coaches carrying passengers.
Mahatma Phule Jayanti: भव्य शोभायात्रेने महात्मा फुलेंना अभिवादन; देखावे पालखीसह ढोलताशांचा गजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com