पुण्याचा प्रवास प्रवाशांसाठी कठीण: नवीन सीबीएसला तिकिटासाठी भली मोठी रांग

गेल्‍या दोन महिन्‍यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्‍याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.
पुण्याचा प्रवास प्रवाशांसाठी कठीण: नवीन सीबीएसला तिकिटासाठी भली मोठी रांग
sakal
Summary

गेल्‍या दोन महिन्‍यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्‍याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

नाशिक : एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. खासगी ट्रॅव्‍हल्‍स, (private travels)वाहनचालकांकडून अव्वाच्‍यासव्वा भाडे आकारले जात आहे. अशात महामंडळाच्‍या खासगी शिवशाहीने(shivshahi bus) प्रवास करणे प्रवासी पसंत करत आहेत. परंतु, सार्वजनिक सुट्या आल्‍याने प्रवाशांच्या वाढलेल्‍या संख्येच्‍या तुलनेत उपलब्‍ध बसगाड्या तोकड्या ठरत आहेत. त्यामुळे रविवारी (ता. २) नवीन सीबीएस बसस्‍थानकावर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची तिकिटासाठी भलीमोठी रांग बघायला मिळाली.

पुण्याचा प्रवास प्रवाशांसाठी कठीण: नवीन सीबीएसला तिकिटासाठी भली मोठी रांग
जळगावमध्ये पंधरा ते अठरा वयोगटांसाठी ४५ हजार लसी

गेल्‍या दोन महिन्‍यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्‍याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. सामन्‍य परिस्थितीत छोट्या- मोठ्या अशा मिळेल त्‍या वाहनांतून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्‍यासाठी तब्‍बल दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. परंतु, नाताळापासून सार्वजनिक सुट्यांमुळे चाकरमान्‍यांकडून प्रवासाची संधी साधली जाते आहे. अशात एसटी बसगाड्या उपलब्‍ध नसल्‍याने प्रवाशांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोना प्रादुर्भाव होण्याची भीती

बसगाड्या उपलब्‍ध नसल्‍याने प्रतीक्षेत असलेल्‍या प्रवाशांच्या गर्दीत वाढ झाल्‍याचे चित्र होते. रविवारी नवीन सीबीएस बसस्‍थानकात विनावाहक असलेल्‍या खासगी शिवशाहीचे तिकीट मिळविण्यासाठी मोठी रांग लागली होती. प्रवाशांच्या या रांगेने संपूर्ण बसस्‍थानकाला वेढा घातला होता. तिकीट मिळाल्‍यानंतरही एसटी बसच्‍या प्रतीक्षेत प्रवाशांना आवारात थांबून राहावे लागत होते. या संपूर्ण प्रकारामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्‍यक्‍त केली जात होती.

पुण्याचा प्रवास प्रवाशांसाठी कठीण: नवीन सीबीएसला तिकिटासाठी भली मोठी रांग
राज्यसेवेची पूर्वपरीक्षा फेब्रुवारीत? 'या' दिवशी येणार वेळापत्रक

खासगी ट्रॅव्‍हल्‍सकडून संधीचे सोने

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी ट्रॅव्‍हल्‍स चालकांकडून अव्वाच्‍यासव्वा भाडे आकारणी केली जात होती. पुण्यासाठी एक हजार रुपयांपर्यंत मागणी केली जात होती, तर धुळ्यासाठी चारशेपर्यंत भाडे आकारले जात होते. छोट्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक सुरू असल्‍याचा धक्‍कादायक प्रकार बघायला मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com