जळगावमध्ये पंधरा ते अठरा वयोगटांसाठी ४५ हजार लसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine for child  child vaccination

जळगावमध्ये पंधरा ते अठरा वयोगटांसाठी ४५ हजार लसी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात(jalgaon district) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सोमवारपासून (ता. ३) राबविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी आठपासून ही मोहीम सुरू होईल. ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक केंद्र तर जळगाव शहरात ४ केंद्रात लसीकरण सुरू होईल. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशांचे लागलीच लसीकरण होईल. सोबत आधारकार्ड आणावे लागेल. ऑफलाईन पद्धतीनेही लस मिळेल. या वयोगटासाठी जिल्ह्यात ४५ हजार लशींची उपलब्धता आहे.

हेही वाचा: जळगाव : सामाजिक विषयांवर तरुणाईचा कल्पनाविष्कार

जिल्ह्यात कोरोना महामारीपासून संरक्षण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात संसर्ग प्रतिबंधात्मक लस देणे सुरू झाली. सुरवातीस डॉक्टर, फ्रंट लाईन वर्कर, पोलिस, महसूल कर्मचारी, नंतर ४५ वयोगटानंतरच्या सर्वच वयोगटासाठी लस देण्यात आली. एक मार्च २०२१ पासून १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी लस देणे सुरू झाले. जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख ३६ हजार ३२५ आहे.

लसीकरण पात्र लोकसंख्या ३४ लाख ६ हजार ६०० असून आतापर्यंत पहिल्या टप्प्यात २७ लाखांच्यावर, १५ लाखांच्या दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील असे एकूण ४१ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात १ जूनपासून १८ वर्ष वयोगट यावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. शाळा महाविद्यालयीन १५ ते १८ वर्ष वयोगटातील युवकासाठी उद्यापासून (ता. ३) लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात अठरा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुला- मुलींची संख्या दोन लाख २५ हजार ५२८ आहे. उपलब्ध लस मात्रेनुसार शहर महापालिकेसह जिल्ह्यात केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत.

हेही वाचा: जळगाव : २८० फूट संडे-१ सुळका केला सर

महापालिकेतर्फे ४ केंद्रे अशी

महापालिकतर्फे १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोविन ॲपवर ऑनलाइनन नोंदणी केली जात आहे. शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, डी. बी. जैन हॉस्पिटल (शिवाजीनगर), कांताई नेत्रालय (निमखेडी रोड), सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता हॉस्पिटल या केंद्रावर लसीकरण सुरू राहील. केंद्रांवर पहिला डोस ५० टक्के ऑनलाइनन व ५० टक्के ऑनसाईट देण्यात येणार आहे उपाशीपोटी लस घेऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top