Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

लखमापूरच्या मंदा आजींच्या हत्येने माणुसकी हादरली; सोने-पैशांच्या लालसेपोटी केले अमानुष कृत्य.
mandakini sonawane killed by youth

mandakini sonawane killed by youth

sakal

Updated on

वणी (नाशिक) - ज्याला घरात आसरा दिला, मायेने सांभाळले, घासातला घास दिला, खाऊ-पिऊ घातले; त्याच व्यक्तीने सोन्या-पैशांच्या लालसेपोटी वृद्ध महिलेचा जीव घ्यावा, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मंदाकिनी (मंदाआजी) हरिभाऊ सोनवणे (वय ७०) यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरला असून, या घटनेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com