Municipal Corporation
sakal
नाशिक: नाशिक महापालिकेतर्फे राजमुंद्रीहून आणलेल्या पंधरा हजार झाडांच्या रोपणाचा कार्यक्रम तसेच ६८९ कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ सोमवारी (ता. १५) कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तपोवनातील वृक्षतोडीला नागरिकांचा प्रचंड विरोध सुरू असतानाच राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवरील या कार्यक्रमाकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.