Trekking
sakal
तुषार माघाडे- नाशिक: कोरोनानंतर जिमच्या चार भिंतीत अडकलेली फिटनेसची कल्पना आता खुल्या हवेत फिरायला लागली आहे. नाशिकमधील तरुण आता फिटनेस म्हणजे फक्त ट्रेडमिलवर धावणे नव्हे, तर डोंगर चढणं, धबधबे गाठणे आणि निसर्गात शरीर घामाघूम होणे असं मानू लागले आहेत. थंडी पडताच नाशिककर ‘फिटनेस फिक्र’ तरुणांची पावले आता ट्रेकिंगसाठी निसर्गाच्या कुशीत शिरत आहेत.