Ashram School Teacher Exam : शिक्षक परीक्षा घेण्यावर आदिवासी विभाग ठाम; आदिवासी आयुक्तांसमवेत झालेली बैठक निष्फळ

Department of Tribal Development
Department of Tribal Developmentesakal

Ashram School Teacher Exam : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या क्षमता परीक्षा घेण्याचा निर्णयाविरोधात आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्या समवेत विविध संघटनांच्या झालेल्या बैठक निष्फळ ठरली.

निर्णायावर तोडगा न निघाल्याने शिक्षक संघटनांनी परीक्षांवर बहिष्कार कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. विभागानेही शिक्षकांची परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे सांगितले. (Tribal department insists on conducting teacher exam nashik news)

आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी परीक्षा घेतल्यानंतर विभागाने शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १७ सप्टेंबरल परीक्षेचे आयोजन केले आहे. ही परीक्षा शिक्षकांना अनिवार्य केली आहे. मात्र, काही शिक्षक संघटनांनी यास विरोध केला आहे.

अनेक शिक्षक संघटनांनी निवेदन देत परीक्षा नको, अशी मागणी केलेली आहे. यासंदर्भात आदिवासी विकासमंत्री गावित यांच्याकडे देखील अनेक संघटनांनी धाव घेत परीक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांची परीक्षा नको अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे. त्यामुळे शिक्षक परीक्षांना विरोध वाढला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Department of Tribal Development
Ashram School Teacher Exam : आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची 17 सप्टेंबरला परीक्षा; आदिवासी विकास विभागाचा निर्णय

याच पार्श्वभूमीवर आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी मंगळवारी (ता. १२) विविध शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळांसमवेत बैठक घेत चर्चा केली. यात आयुक्त गुंडे यांनी परीक्षामागील उद्देश विशद केली. यात शिक्षकांवर कोणताही कार्यवाही केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी परीक्षा नकोच, अशीच भूमिका मांडली.

यामागील भूमिका समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र, चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनी परीक्षांवरील बहिष्कार कायम ठेवणार असल्याचे बैठकीनंतर जाहीर केले. आदिवासी विभागाने देखील ठरल्याप्रमाणे १७ सप्टेंबरला शिक्षकांची परीक्षा घेतली जाईल. या नियोजनात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले

Department of Tribal Development
Ashram School : 20 वर्षांपासून इमारती अभावी भरतेय आश्रमशाळा! शाळा स्थलांतरित केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com