नाशिक- आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना परदेशात पीएच. डी., पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आदी उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न साकार होणार आहे.