नाशिक: आदिवासी विकास विभागाकडून दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी न्यूक्लिअस बजेट योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण राज्यभरातून ३६ हजार ३२ लाभार्थ्यांनी नोंदणी केली. इच्छुक लाभार्थ्यांचे २१ हजार ७४७ अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी करून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. २०२५-२६ या वर्षातील लाभार्थ्यांना विहित मुदतीत लाभ दिला जाईल.