नाशिक- आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सोमवारी (ता. १४) सहावा दिवस होता. या आंदोलनात सुमारे ६०० कर्मचारी सहभागी असून, पावसात ठाण मांडून ते आपली मागणी लावून धरत आहेत. बाह्यस्रोतांद्वारे भरती रद्द करावी व जुन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा पदावर घेण्यात यावे, यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सोमवारी अनेकांना उपाशीपोटी दिवस काढावा लागला. कारण, आंदोलकांचे धान्य संपले आहे.