सातपूर- जांबुटके (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथे आदिवासी लघुउद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’ला राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवार (ता. १७)च्या बैठकीत मंजुरी मिळाली. यामुळे स्थानिक आदिवासी उद्योजकांना मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून, औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने हा भाग झपाट्याने विकसित होईल.