Tribal Protest
sakal
नाशिक: आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांत खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेच्या विरोधात आयुक्तालयासमोर तीन महिन्यांपासून आंदोलन करणारे बिऱ्हाड आंदोलक आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. आदिवासी महापंचायतीत मांडलेले ठराव राज्यपालांना देण्यासाठी हे आंदोलक पायीच मुंबईकडे निघाले. त्यासाठी आंदोलकांचा एक गट मंगळवारी (ता. १४) नाशिकहून मुंबईच्या दिशेने पायी निघाला. दुसरीकडे आयुक्तालयासमोर सुरू असलेले आंदोलनही कायम आहे.