नाशिक: आदिवासी आयुक्तालयासमोर दोन महिन्यांपासून ठाण मांडलेल्या बिऱ्हाड आंदोलकांनी आता राज्यातील सर्व सरपंचांच्या उपस्थितीत संयुक्त ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अधिकृत निमंत्रण देण्यात येणार आहे. आमच्या गावात कंत्राटी शिक्षक नको, असा ठराव या ग्रामसभेत मांडला जाणार आहे.