Nahik News : त्र्यंबक रोडवरील अरुंद रस्ता जीवघेणा; रुंदीकरणाची मागणी तीव्र
Urgent Need for Road Widening on Trimbak Road : समृद्धीनगर ते पिंपळगाव बहुला मार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले असून, स्थानिकांकडून रुंदीकरण आणि दुभाजकाची मागणी जोर धरते आहे.
नाशिक- त्र्यंबक रोडवरील समृद्धीनगर ते पिंपळगाव बहुला जकात नाका दरम्यानच्या मार्गाचे अनेक वर्षांपासून रुंदीकरण रखडले आहे. या मार्गावरील वाहतुकीची तीव्रता पाहता रुंदीकरण करून रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसविणे आवश्यक आहे.