Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरला आता पर्यटनासाठीही 'अ' वर्ग दर्जा; विकासाला गती मिळणार
Trimbakeshwar Awarded A-Grade Tourism Status : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे विहंगम दृश्य. या तीर्थक्षेत्राला आता राज्य शासनाने पर्यटनासाठी 'अ' वर्ग दर्जा दिला आहे.
नाशिक- देशातील १२ ज्योतिर्लिंगांमध्ये समाविष्ट असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रापाठोपाठ पर्यटनासाठी ‘अ’ वर्गाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ३०) या संदर्भातील घोषणा केली.