Farmers Protest
sakal
वणी: दिंडोरी-पालखेड-लोखंडेवाडी-जोपूळमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम भूसंपादन न करता सुरू केल्याच्या निषेधार्थ जोपूळ येथे बाधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास सुरवात केली आहे. भूसंपादन करून योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे.